द ग्रेट इंडियन कपिल शोचा होस्ट कपिल शर्मा डिप्रेशनचा सामना आणि निर्मितीमुळे झालेल्या आर्थिक नुकसानीबद्दल बोलला आहे
भारतीय घराघरात लोकप्रिय असलेला एक विनोदी कलाकार म्हणजे कपिल शर्मा. गेल्या १० वर्षांपासून कपिलने आपल्या शो, लाईव्ह परफॉर्मन्स आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. पण त्याने प्रसिद्धीच्या कठीण बाजूलाही तोंड दिलं आहे. कपिलने त्याच्या डिप्रेशनबद्दल यापूर्वीही सांगितलं होतं, पण अलीकडेच त्याने दिवाळखोरीच्या मुद्द्याला सुद्धा वाचा फोडली.
‘फील इट इन युअर सोल’ या पॉडकास्टच्या मुलाखतीत कपिलने सांगितलं, “माझं डोकंच खराब झालं होतं. मी दोन चित्रपट तयार केले. खरं सांगायचं तर माझ्याकडे खूप पैसा होता, आणि मला वाटलं की निर्मितीसाठी पैसे असले की पुरेसे आहे. पण पैसा असला तरी निर्मिती करण्याचं वेगळं प्रशिक्षण लागतं.”
कपिलने यामध्ये सांगितलं की निर्मात्यांना वेगळीच दृष्टिकोनाची गरज असते, आणि तो या मार्गावर प्रचंड पैसा खर्च करून दिवाळखोरीत गेला. कपिलने याबाबत त्याची पत्नी गिन्नी चतरथने त्याला डिप्रेशनमधून बाहेर येण्यास मदत केली, असंही सांगितलं. कपिलचं दिवाळखोरीचं आणि इतर कारणांनी त्याचा डिप्रेशन अधिकच वाढला.

सध्या कपिल शर्मा पुन्हा जोमात आला आहे. टीव्ही शोद्वारे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यानंतर तो आता OTT प्लॅटफॉर्मवरही प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. तो नेटफ्लिक्सवर त्याचा ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’चा दुसरा सीझन होस्ट आणि को-प्रोड्युस करत आहे. काही महिन्यांतच शोच्या दुसऱ्या सीझनने सुरुवात केली आहे. त्याच्या शोमध्ये आमिर खान, रणबीर कपूर, आलिया भट्ट, ज्युनियर एनटीआर, राजकुमार राव, सैफ अली खान, दिलजीत दोसांझ यांसारख्या प्रसिद्ध व्यक्तिमत्वांनी हजेरी लावली आहे. एवढंच नव्हे तर, गायक एड शीरनने सुद्धा कपिलच्या शोमध्ये हजेरी लावली, जेव्हा तो आपल्या कॉन्सर्टसाठी मुंबईत आला होता.
तो ठाम होता…’: ऐश्वर्या रायच्या वाढदिवसाला अभिषेक बच्चन का हजर नव्हता, जाणून घ्या कारण
read more about अभिषेक बच्चन-ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या अफवांदरम्यान, काजोलने त्यांना ‘लग्न वाचवण्याचा’ सल्ला दिला