‘आई कुठे काय करते’ ही मराठीतील एक अतिशय लोकप्रिय मालिका, सलग ५ वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन करून आता निरोप घेत आहे, आणि त्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजी आहे. या मालिकेत अभिनेत्री रुपाली भोसलेने साकारलेली संजनाची खलनायिका प्रेक्षकांना विशेष भावली. संजनाच्या भूमिकेने रुपालीला एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे, आणि मालिका संपल्यानंतर रुपाली भावुक झाली आहे.
रुपाली भोसलेची भावुक प्रतिक्रिया – ‘आई कुठे काय करते’ मालिकेचा निरोप आणि संजनाची भूमिका
रुपालीने नुकतीच ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत ‘आई कुठे काय करते’ या मालिकेबद्दलची आपली भावना व्यक्त केली. तिला विचारण्यात आले की, “मालिका संपल्यानंतर जास्त कोणाला मिस करशील?” यावर रुपालीने अनिरुद्धचं नाव घेतलं. ती म्हणाली, “अरुंधतीबरोबर ऑफ-कॅमेरा आमचं छान बॉन्ड आहे, पण नियमित गप्पा होत नाहीत. सेटवरचा असा एक व्यक्ती ज्याला मी नक्कीच मिस करेन, तो म्हणजे मिलिंद सर…म्हणजेच अनिरुद्ध देशमुख.”
आई कुठे काय करते’ ची संजना मिस करणार मिलिंद सरांना – रुपाली भोसलेची मनमोकळी मुलाखत
ती पुढे म्हणाली, “मिलिंद सरांशी झालेल्या मानसिक, भावनिक आणि व्यावसायिक गप्पा, त्यांच्याबरोबर शेअर केलेल्या गोष्टी या सर्व मला कायम लक्षात राहतील. गौरीनंतर या सेटवर मला सर्वात जवळची माणसं कुणी वाटत असतील तर ते मिलिंद सर आहेत.” सुरुवातीला संजनाची भूमिका अभिनेत्री दिपाली पानसरेने साकारली होती, मात्र काही कारणांमुळे दिपालीने मालिका सोडली आणि रुपाली भोसलेची या भूमिकेत एन्ट्री झाली. तिच्या संजनाचाही प्रेक्षकांनी भरभरून स्वीकार केला.
read: navra maza navsacha
