प्रसिद्ध कोरियन अभिनेता डॉन लीच्या एका पोस्टने चाहत्यांना केले उत्साहित; त्याने प्रभासच्या ‘सलार’मधील एक पोस्टर शेअर केले आहे.
बाहुबली’च्या यशानंतर प्रभासने स्वतःला एक पॅन-इंडिया स्टार म्हणून सिद्ध केलं आहे. त्याच्या अभिनयाचे संपूर्ण देशभरात कौतुक होतं आणि त्याचे चाहते त्याच्या सिनेमांची आतुरतेने वाट पाहत असतात. त्याचे सिनेमे प्रचंड कमाई करतात आणि बॉक्स ऑफिसवर धमाका करतात. प्रभासकडे अनेक मोठ्या बजेटचे सिनेमे आहेत, जे पुढील काही वर्षांत त्याच्या चाहत्यांचे मनोरंजन करतील. आता या यादीत आणखी एक नाव समोर येत आहे – कोरियन अभिनेता डॉन ली.

डॉन लीने नुकताच प्रभासच्या ‘सलार पार्ट १: सीजफायर’ या चित्रपटातील एक फोटो शेअर केला असून त्याच्याबरोबर थंब्स-अप इमोजी देखील दिला आहे. यामुळे चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे की, डॉन ली प्रभासच्या कोणत्या चित्रपटात सहभागी होणार आहे का? अनेकजण या पोस्टवर चर्चा करत आहेत की डॉन लीला ‘सलार २’ मध्ये खलनायकाची भूमिका दिली जाऊ शकते का? त्याचवेळी, काही अफवांमध्ये असेही सांगितले जात आहे की प्रभासच्या ‘स्पिरिट’ या चित्रपटातही एक कोरियन कलाकार खलनायकाच्या भूमिकेत दिसू शकतो. यामुळे चाहत्यांमध्ये गोंधळ उडाला आहे की, डॉन ली ‘सलार २’ मध्ये असेल का ‘स्पिरिट’मध्ये?
सलार २’ मधील खलनायक असेल का?
‘स्पिरिट’ आणि ‘सलार पार्ट २’ व्यतिरिक्त प्रभासच्या यादीत ‘द राजा साब’ आणि ‘कळकी २८९८ एडी’ यांसारखे मोठे सिनेमे आहेत. ‘द राजा साब’ हा एक रोमँटिक हॉरर कॉमेडी सिनेमा असणार आहे आणि तो एप्रिल २०२५ मध्ये प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, प्रभासने ‘सलार २’साठी शूटिंगला सुरुवात केली आहे, ज्यात अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
read:श्वेता बच्चनने ऐश्वर्या रायबद्दल केलेला धक्कादायक खुलासा व्हायरल, ‘तो घाबरतो’